Top News

अडीच वर्षाच्या कालावधीनंतर बोरगाव नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आरक्षण जाहीर



अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

कर्नाटकातील पट्टन पंचायतच्या निवडणूका डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात आल्या होत्या.परंतु आरक्षणाला कांहीं काळ स्थगिती मिळाली होती, काल शासनाकडून राज्यांतील उपेक्षित पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे., तब्बल ३० महिन्यांनी आज आरक्षण जाहीर झाले असून बोरगांव नगर पंचायत मध्ये अध्यक्ष पदासाठी एससी व उपाध्यक्ष पदासाठी ओबीसी अ महिला असे आरक्षण झाले असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी कोण दावेदार ठरणार हे सध्या पहावयास मिळणार आहे. 

          डिसेंबर २०२१ मध्ये बोरगाव नगरपंचायतची पंचवार्षिक निवडणूक झाली. निवडणूक निकालानंतर आरक्षण कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते तब्बल ३० महिन्यापर्यंत सर्वांना प्रतीक्षा करावी लागली. या आरक्षण लांबनी मुळे शहराचा विकास थांबला होता.चालना मिळत नव्हती, यासाठी शासनदरबारी आरक्षण लवकरात लवकर जाहीर व्हावे यासाठी अनेक वेळा संबंधित विभागाच्या मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी यांना भेटण्यात आले .तरीपण शासनाच्या आडकाठी धोरणामुळे आरक्षण जाहीर झाले नव्हते. आज कर्नाटक शासनाकडूनच अधिकृत आदेश पत्र आले .आरक्षणाचे अधिकृत आदेश पत्र आल्याने आता विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. 

 बोरगांव पंचायत साठी अध्यक्ष पदासाठी एससी आल्याने यामध्ये सौ . संगीता अमर शिंगे, पिंटू तुकाराम कांबळे ,व दिगंबर दिलीप कांबळे या नगरसेवकांचे नाव चर्चेत आहे. तर ओबीसी अ महिला उपाध्यक्ष पदासाठी हे आरक्षण आल्याने यामध्ये रुकसाना बाळासाब अफराज व भारती वसवाडे यांची नावे चर्चेत आहेत. असे असले तरीही गट प्रमुख हाय कमांड च्या निर्णयानंतरच अध्यक्षपदाची व उपाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे सिद्ध होणार आहे. यासाठी आतापासूनच हालचाली गतिमान झाल्याचे दिसत आहे.


थोडे नवीन जरा जुने