हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरढोण गावातील नदीकाठावरील वस्तीतील पाणदारे मळी, घोरपडे मळी,बंडगर मळी ,कुरुंदवाड रस्ता व इतर भागातील नदीचे पुर आलेल्या ठिकाणांहून जनावरे पुर नसलेल्या माळभाग,शाळा ई.ठिकाणी स्थलांतरातील झालेल्या जनावरांच्या वैरणीसाठी श्री.दत्त साखर कारखान्यांकडे चालू हंगामासाठी नोंद असलेले श्री.बाजीराव मोरे यांचे प्लॉट वैरणीसाठी काढून श्री दत्त कारखाना नोकर स्टाफ व स्थानिक नेत्या मार्फत नियोजन करुन वाटप चालु असलेले श्री दत्त चे मा.गणपतराव पाटील यांचे शिरढोण गावकरी व पुर ग्रस्तांमार्फत अभिनंदन होत आहे.सदर ठिकाणी श्री दत्त शेती मदतनीस दिलीप कांबळे तसेच स्थानिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सागर टाकवडे, महादेव पाणदारे, सुरेश कोरे,माय्याप्पा पाणदारे व सर्व पत्रकार बंधू हजर होते.
