शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
रक्षाबंधनाच्या पुर्वी लाडकी बहिन योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. याप्रमाणे 16 ऑगस्ट पासुन शिरोळ मधील महिलांच्या खात्यावर 3000 रूपये जमा होत आहेत.
शिरोळ मधील सेंट्रल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया,भरत ॲबन बँक, विदर्भ कोकण बँक येथे महिलांची पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. ज्या महिलांचे खाते आधार कार्डला लिंक नाहीत अशा महिलाच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. यामुळे आधार कार्ड लिंक करण्यासाठी पोस्ट ऑफिस आणि संबधित बँकेत गर्दी होत आहे. रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थी या सनाच्या पार्श्वभुमीवर आलेल्या पैसेमुळे महिलांना अर्थिक दिलासा मिळाला आहे. तर बाजारात तेजी येणार आहे. कोणत्याही मध्यस्थीविना डायरेक्ट महिलांच्या खात्यावर पैसे आल्यामुळे महिला वर्गातुन समाधान मानण्यात येत आहे. सरकारी योजना नागरीकांच्या घरात मात्र भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून आनंद साजरा केला नाही. याचे कोणते कारण आसेल, असा प्रश्न नागरीकांच्या मनात पडला आहे.
