Top News

निमशिरगाव मध्ये अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याने केला आत्मदहन करण्याचा प्रयत्न



निमशिरगांव / शिवार न्यूज नेटवर्क : 

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गातील शेतक-यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भुसंपादन करू देणार नाही म्हणून निमशिरगांव ता. शिरोळ येथे जमीनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिका-यासमोर शेतकऱ्या ने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शासनाने रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाला चौपट मोबदला दिला आहे मात्र याच मार्गातील अंकली ते चोकाक या मार्गावरील रस्त्यावर महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दुप्पट मोबदल्याच्या कायद्यामुळे शेतक-यांचे नुकसान होत असल्याने संतप्त होवून शेतक-यांनी आत्मदहन करण्याच प्रयत्न केला.



थोडे नवीन जरा जुने