Top News

शिये फाटा येथे झालेल्या अपघातात महिला ठार

 




किशोर जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापुर - शिये फाटा येथे झालेल्या अपघातात वैशाली अजित पोळ (वय 35 रा.मराठा कॉलनी,क.बावडा) यांचा पाण्याचा टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती शिरोली एमआयडीसी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला.या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस झाली आहे.

अधिक माहिती अशी की,वैशाली पोळ या पेठ वडगाव येथे कोर्टात नोकरीस आहेत.त्या काम संपवून आपल्या दुचाकी वरुन घरी येत असताना शिये फाटा येथे आल्या नंतर त्यांची गाडी स्लिप होऊन खाली पडल्या असता पाठी मागून येणाऱ्या पाण्याच्या टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांना दोन मुले असून त्यांचे पती चिपळूण येथे एमएसईबीत शिपाई आहेत.त्यांच्या अशा निधनाने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या नातेवाईकांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली होती.

थोडे नवीन जरा जुने