जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या अभिनव प्राथमिक विद्या मंदिर चे मुख्याध्यापक महावीर धनपाल शिरढोणे (रा.शेडशाळ) वय ५६ यांचे कोल्हापूर - सांगली महामार्गावरील चिपरी नजिक झालेल्या अपघातात निधन झाले.शेडशाळच्या सरपंच पुष्पा शिरढोणे यांचे ते पती होत.त्यांचे सोबत असलेले शेडशाळचे श्री.राजेंद्र बापूसो लाड हे जखमी झाले आहेत.
७ मे रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणूक कर्तव्य बजावून रात्री उशिरा घरी परतून शाळेच्या कामकाजासाठी सकाळी कोल्हापूर येथे गेले होते. अत्यंत कामसू व मनमिळावू स्वभावाचे होते.त्यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
