Top News

बोरगाव विद्यासागर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी दहावी केंद्रात प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक पटकाविला

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

        बोरगाव येथे दहावी सेंटर ची मार्च-एप्रिल 2024 मध्ये झालेल्या परिक्षेत येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बोरगांव सेंटर मध्ये दहावी परीक्षा केंद्रात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक घेऊन संस्थेचे नावलौकिक केले आहे.

       संस्थेतील विद्यार्थी दर्शन दीपक मगदूम याने 92.96 गुण पटकावून केंद्रात प्रथम,कु.प्रवीण गणे यानी 92.64 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर आर्यन संदीप महाजन यांनी 91.52 टक्के गुण मिळवून केंद्रात तृतीय क्रमांक मिळवला आहे.शिवाय इंग्लिश माध्यम विद्यार्थ्यांमध्ये आर्यन महाजन यांनी 91.60 टक्के गुण मिळवुन प्रथम, तर कुमारी प्राची हवले हिने 89.76 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर ओमकार पाटील यांनी 90.80% गुण मिळवून कन्नड विभागात तृतीय तर स्वयम् करवते यांनी 74.8% गुण मिळवून इंग्रजी विभागात तृतीय क्रमांक पटकावला असल्याने या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेसह भागातून गोड कौतुक केले जात आहे

     50 पैकी 42 विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळवल्याने बोर्ड परीक्षेमध्ये शाळेचा निकाल 86 टक्के लागला आहे.

         बोरगाव परीक्षा केंद्रात एकूण 379 विद्यार्थ्यानी परीक्षेसाठी सहभाग घेतला होता.या परीक्षेत विद्यासागर शिक्षण संस्थेच्या 50 विद्यार्थ्यानी परिक्षा दिली होती.त्यापैकी 42 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असल्याने शाळेचा दहावीत 86 टक्के निकाल आला आहे.यामध्ये 08 विद्यार्थी डिस्टिंक्शन,19 विद्यार्थी प्रथम श्रेणीने तर 15 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

       यावेळी बोलताना संस्थापक अण्णासाहेब हवले म्हणाले की आपण विद्यार्थ्यांना सुसंस्कृत शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्याचेही संस्थेमार्फत सातत्याने पाहत असतो त्यामुळे बोरगाव केंद्रात प्रथम द्वितीय तृतीय येऊन शाळेचे नाव लौकीक करत पास झालेले सर्वच विद्यार्थी डिस्टिंक्शन व प्रथम श्रेणीने यशस्वी झाल्याचे सांगून त्यांना पुढील काळात यश मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली.

    यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब हवले,विद्याधर अम्मन्नावर, बाबासाहेब पाटील,मलगोंडा म्हैशाळे,रावसाहेब तेरदाळे,शिवाप्पा माळगे,सुकुमार चिप्रे,अशोक पाटील,बाळासाहेब कमते,मुख्याध्यापक एस ए कोळी,राजू खिचडे ,अजित हवले,नेमिनाथ बारवाडे,यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व पालक वर्गाचे मार्गदर्शन मिळाले. 

थोडे नवीन जरा जुने