Top News

संजय घोडावत विद्यापीठात बी. बी. ए प्रवेश परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा

 


अतिग्रे / शिवार न्यूज नेटवर्क :

 महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बी. बी. ए या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. या प्रवेश परीक्षेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने संजय घोडावत विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागातर्फे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

        दि.10 मे रोजी ऑनलाईन आणि 17 मे रोजी ऑफलाईन स्वरूपात ही कार्यशाळा संपन्न होणार आहे.इच्छुक विद्यार्थी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणारा ऑनलाईन फॉर्म भरून नाव नोंदणी करू शकतात.  या कार्यशाळेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थांनी घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने