नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :
औरवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या युवकांला जीव गमवावा लागला सदर मयत व्यक्तीचे नाव संभाजी मारुती शिंदे ( वय 45 ) (रा . लकडेवाडी तालुका जत जिल्हा सांगली) गोसावी समाजातील काही कुटुंबे जुन्या कपड्याच्या व्यवसायासाठी नृसिंहवाडी येथे जगदाळे कॉलेज च्या मैदानात झोपड्या बांधून राहत होते सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला असता पोहता न आल्याने बुडाला सदर व्यक्तीस शोधण्यासाठी वजीर रेस्क्यु फोर्स व औरवाडच्या काही युवकांनी मदत केली .
