कुरूंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड येथील जैन सांस्कृतिक भवन लगत दुचाकी व चार चाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघात घडल्यानंतर चारचाकी चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे समजते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, शेडशाळ येथील शुभम शशिकांत केरीफळे (वय वर्षे २५) व अखिलेश महावीर मुळे (वय वर्षे ३०) हे मोटरसायकल वरून कुरुंदवाड होऊन शेडशाळेच्या दिशेने जात होते. कुरुंदवाड येथील जैन सांस्कृतिक भवन लगत असणाऱ्या रसवंतीगृहसमोर दुचाकी व चार चाकी गाडीचा अपघात झाला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याचे घटनास्थळावरून समजते. या जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी कुरुंदवाड पोलीस दाखल झाले आहेत.
