Top News

दाभाडे कुटूंबियांचे परिवर्तन चळवळीला बळ : राजेंद्र प्रधान

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

आधार सोशल फाउंडेशनचे प्रमुख व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र दाभाडे यांनी मातोश्री इंदुमती दाभाडे यांच्या मृत्यूनंतर नेत्र व त्वचादान करून सामाजिक चळवळीला बळ दिले आहे . समाजाप्रती त्यांनी केलेले कार्य अभिमानास्पद आहे. समाजातील गरजूंना मदत झाली पाहिजे यासाठी नेत्रदान , रक्तदान , त्वचादान , देहदान अशा परिवर्तनशील उपक्रमात समाजाने पुढे यावे . असे मत शिरोळ तालुका पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.  येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका श्रीमती इंदुमती धोडीराम दाभाडे यांचे निधन झाल्याने त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूसमयी राजेंद्र दाभाडे व कुटूंबियांनी त्यांचे नेत्र व त्वचादान केले होते. नेत्र व त्वचादान उपक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल शिरोळ तालुका पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते व आधार सोशल फाउंडेशनचे प्रमुख राजेंद्र दाभाडे व त्यांच्या पत्नी विजया दाभाडे यांचा सांगली येथील नंदादीप नेत्रालय व रोटरी स्किन बँकेतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. राजेंद्र दाभाडे व कुटुंबीयांची भेट घेवून संबंधीत कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

      रोटरी स्किन बँकेच्या स्मरणिका डुबल म्हणाल्या , सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका इंदुमती धोंडीराम दाभाडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नेत्र व त्वचादान करून राजेंद्र दाभाडे व त्यांच्या पत्नी विजया दाभाडे यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. हा समाजात चांगुलपणा टिकला पाहिजे . यासाठी नंदादीप व रोटरी संस्था समाजाप्रती योगदान देत आहे असे सांगून त्यांनी रक्तदानाबरोबरच त्वचा आणि नेत्रदान हे सुद्धा श्रेष्ठदान आहे . अंध व्यक्तींना दृष्टी आणि जळीत झालेल्या अनेक रुग्णांना पुन्हा धैर्याने जगण्याचा आधार दिला असल्याचे सांगितले.

      यावेळी रोटरी स्किन बँकेचे वरिष्ठ बायोटेक्नॉलॉजिस्ट स्मरणिका डुबल ,ज्युनिअर बायोटेक्नॉलॉजिस्ट मेघा पट्टणकुडे , नंदादीप आय डोनेशन चे विनायक परीट यासह  पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र प्रधान , खंडेराव हेरवाडे , सचेतन बनसोडे , ज्येष्ठ पत्रकार विश्वास कांबळे , डॉ दगडू माने , चिदानंद कांबळे तसेच नंदादीप नेत्रालय व रोटरी स्किन बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने