संदीप कोले / शिवार न्यूज नेटवर्क :
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर साजरी केली जाते. हेरले येथील श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण बाळासो कराळे यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन हनुमान देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आली . या कार्यक्रम प्रसंगी विजय कारंडे, संतोष भोसले, नंदकुमार माने, आप्पासो कागले, पांडुरंग राबाडे, पांडुरंग शिंदे, नारायण खांडेकर, कपिल भोसले, इनामदार, राहुल कराळे, गणेश ढेरे, पोपट शिंदे , विनोद अशोक वड्ड, विजय पाटील, सौरभ भोसले आदी उपस्थित होते.
