अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
मे महिन्याच्या ७ तारखेला चिकोडी लोकसभेसाठी मतदान होत आहे, भाजपा पक्षाकडून दुसऱ्यांदा खासदार आण्णासाहेब जोल्ले निवडणुक लढवत आहेत. आज पर्यन्त जोल्ले आण्णांच्या प्रचाराला युवकांतून वाढता प्रतिसाद मिळत आहे, याच पार्श्वभूमीवर निपाणी तालुक्यातील शेंडुर येथील कार्यकर्ते वहिनींच्या विकास कामाला प्राधान्य देऊन भाजपा पक्षात प्रवेश केला.
यावेळी निपाणीच्या भाजप आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी शेडूर कार्यकर्त्त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यक्रमाला उद्देशून बोलतांना वाहिनी म्हणाल्या की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या भाजपा प्रणित केंद्र सरकारची विकास कामे आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन शेंडूर गावातील कार्यकर्ते प्रवेश ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.येणाऱ्या काळात शेंडूर गावाच्या विकासासाठी मी व आण्णासाहेब जोल्ले प्रामाणिक पने काम करीन. यावेळी श्री राजेंद्र लाड, श्री प्रवीण लाड यांच्या नेतृत्वाखाली श्री विनायक गिरी, श्री तुकाराम वडेखर, श्री पांडुरंग लाड, श्री गजानन कांबळे, श्री राजेंद्र दळवी, श्री अण्णप्पा तोडकर, श्री संदीप देसाई आणि त्यांच्या टीममधील सदस्यांनी इतर पक्ष सोडून भाजपा पक्षात प्रवेश केले. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना मत्ताधिक देन्याचे अभिवचन दिले.
