Top News

मतदार संघातील विकास कामांमुळेच भाजपचा विजय निश्चित : अण्णासाहेब जोल्ले


   अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

           चिकोडी लोकसभा मतदारसंघात भाजपने केलेल्या विकास कामामुळे क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मोठे बळ दिले आहे. त्यामुळे भाजपाकडे नवीन कार्यकर्ते येत आहेत. कार्यकर्ते हेच आमची मोठी ताकद आहे. त्यामुळे आम्ही नेहमी कार्यकर्त्यांना सन्मान देत आलो आहोत. नवीन कार्यकर्त्यांच्या आगमनाने भाजपा पक्षाला आणखी बळ मिळाले आहे. नवीन कार्यकर्त्यांच्या बळावरच चिकोडी लोकसभेची निवडणूक आपण जिंकून दाखवू असा विश्वास चिकोडी लोकसभेचे खासदार व भाजपाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केला. यावेळी चाँदशिरदवाड येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत, देवा ग्रुप चे संदिप खोत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षातून भाजपात प्रवेश केला.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौ शशिकला जोल्ले होत्या. पुढे बोलताना खासदार जोल्ते म्हणाले, निपाणी मतदारसंघात आमदार शशिकला जोल्ले आणि आपण विकास करताना कोणतेही राजकारण केले नाही. प्रत्येकाला विकासात सहभागी करून घेतले आहे. यामुळे आपल्याकडे कार्यकत्यांची मोठी फौज तयार झाली. निपाणी तालुक्यात आमदारांनी भरपूर विकास कामे केली आहेत.यापुढेही आपल्या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास व्हावा व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी चे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला निवडून आणावे असे आवाहन करण्यात आले. 

      यावेळी शिरदवाड मधील भाजप प्रवेश केलेल्या कार्य कर्तेंचे स्वागत खासदार आण्णासाहेब जोल्ले, व आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला आवर्जून बोलतांना वाहिनी म्हणाल्या की खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी चिकोडी मतदारसंघातील केलेल्या विकास कामामुळे भाजपा प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पाठिंबा देणारे कार्यकत्यांची संख्या जास्त आहे. केंद्रात भाजपाची सत्ता यावी व नरेंद्र मोदी हे पुन्हा केंद्रात पंत प्रधान व्हावे अशी प्रत्येक कार्यकर्त्यांची तळमळ आहे. या तळमळीतून काम करीत भाजपाला विजयाची हॅट्रिक करण्याचे काम कार्यकर्ते करणार आहेत. चिकोडीतून अण्णासाहेब जोल्ले हे भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 यावेळी हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना चे संचालक श्री रामगोंडा पाटील,जयकुमार आणा खोत, व चांदशिरदवाड येथील माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सूरेश खोत यांच्या नेतृत्वाखाली संदीप खोत, सचिन खोत, बसवराज कुडचे, राकेश खोत, अभिषेक पाटील, आदर्श खोत, सुनील सुतार आणि देवा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजप नेते आण्णा पाटील, संजय पाटील, शीतल लडगे, अजित तोडकर, अनिल पुजारी, अमर कांबळे, महावीर लडगे, जावेद मुजावर, शीतल पाटील, सुभाष पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने