Top News

धैर्यशील माने व डॉ.संजयदादा पाटील यांचे मनोमिलन

 डॉ. संजयदादा पाटील कुरुंदवाडमध्ये  घेणार मोठा मेळावा 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

एकेकाळची खासदारकी लढवलेल्या आणि सध्या खासदार पदासाठी इच्छुक असलेले भाजपचे नेते डॉ.संजयदादा पाटील यांनी धैर्यशील माने यांच्यावर काही दिवसापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. उमेदवारी जाहीर झाल्यापासून आजपर्यंत धैर्यशील माने यांनी मला भेटायला सुद्धा आले नसल्याचा राग त्यांना होता. अखेर धैर्यशील माने यांनी डॉ. संजयदादा पाटील यांची नुकतीच भेट घेतल्याने दोघांचे मनोमिलन झाल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान डॉ. संजयदादा पाटील धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी कुरुंदवाड शहरामध्ये मोठा मेळावा घेणार असल्याचेही समजते. 

धैर्यशील माने यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर डॉ.संजयदादा पाटील यांची त्यांनी भेट घेतली नव्हती. हा मुद्दा पुढे करून डॉ.संजयदादा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती, आणि याचा परिणाम निवडणुकीत दाखवण्याचा इशाराही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला होता. मात्र धैर्यशील माने यांनी डॉ.संजयदादा पाटील यांची नुकतीच भेट घेतल्याने दोघांचे मनोमिलन झाल्याची वार्ता समोर आली आहे. इतकेच नव्हे तर डॉ. संजयदादा पाटील आपली ताकद दाखवण्यासाठी धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कुरुंदवाड येथे कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा लवकरच घेणार असल्याचे समजते. डॉ.संजयदादा पाटील यांनी भाजपाच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली आहे. सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी त्यांचे कार्यकर्ते काम करत असतात. त्यामुळे होणाऱ्या या मेळाव्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वच कार्यकर्ते आणि डॉ.संजयदादाप्रेमी नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

थोडे नवीन जरा जुने