Top News

उदगाव येथे पाठलाग करून युवकाचा धारदार शस्त्राने खून

 


उदगांव / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील खोत पेट्रोल पंपा जवळ एकाचा पाठलाग करून कोयत्याने खून केल्याची घटना आज गुरुवारी दुपारी ४ : ३० वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन चव्हाण राहणार कुपवाड जिल्हा सांगली असे खून झालेल्या युवकाचे नांव आहे. दरम्यान, खून करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरोळ तालुक्यातील उदगाव या ठिकाणी दोन युवक सचिन चव्हाण याचा मोटरसायकलीच्या माध्यमातून पाठलाग करत होते येथील खोत पेट्रोल पंपा समोर आल्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा निर्घुन खून केला. दरम्यान, निर्भया पथकाने प्रसंगावधान राखून खून करणाऱ्या दोन युवकांना तातडीने ताब्यात घेतले आहे. सदरचा खून हा पूर्ववैमन्याशातून झाला असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. घटनास्थळी जयसिंगपूर उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, माने यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने