कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
सध्या लोकसभा निवडणुकीची मोठी चुरस वाढली असून अनेक नेते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानीच्या माध्यमातून निवडणूक लढवणारे राजू शेट्टी यांचे कुरुंदवाड येथील पदसिद्ध व निष्ठावंत कार्यकर्ता आपल्या २०० कार्यकर्त्यांना घेवून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पक्षप्रवेशामुळे कुरुंदवाड मध्ये स्वाभिमानीला मोठा धक्का बसणार आहे.
कुरुंदवाड शहरात गेल्या अनेक महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शहरातील महत्त्वाच्या पदावर काम करणारे युवा नेते पक्षांतर्गत सुरू असलेल्या राजकारणाला कंटाळून सुमारे २०० कार्यकर्ते घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या कोल्हापूर येथील शानदार कार्यक्रमात हा पक्षप्रवेश होणार असल्याचेही समजते.
