कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क
कोणी म्हणत असेल खा. धैर्यशील माने हे कारखानदारांचे उमेदवार आहेत तर ते साफ चुकीचे असून खा धैर्यशील माने हे जनतेच्या मनातील खासदार आहेत. त्यांना माजी खासदार बाळासाहेब माने माजी खासदार निवेदिता माने यांचा वारसा आहे. असे प्रतिपादन कुरुंदवाड शिवसेना शहरप्रमुख सोमेश गवळी यांनी केले. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने यांच्या पत्नी वेदांतिका माने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी कार्यकर्ता बैठक आयोजित केली होती त्यावेळी सोमेश गवळी बोलत होते. गवळी यांच्या घरी कार्यकर्ता व महिला भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
याप्रसंगी वेदांतिका माने म्हणाल्या आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे आणि त्या माध्यमातून दादा हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावे .पुढील काळात दादांच्या माध्यमातून या मतदारसंघातील प्रश्न सोडविले जातील अशी ग्वाही यावेळी दिली. यावेळी प्रा चंद्रकांत मोरे, माधुरी टाकारे , रघु नाईक अल्ली पठाण यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
