Top News

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगुलपणा जोपासण्याचा प्रयत्न केला चंद्रकांत भाट

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : 

सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असताना चांगुलपणा जोपासत समाजाची प्रगती व्हावी यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न लेखणीतून निर्भीडपणे मांडून अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला या कामासाठी अनेकांचे पाठबळ मिळत गेले आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन आत्मसन्मान गौरव पुरस्कार मिळत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन शिरोळ तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत भाट यांनी केले.

संघर्षनायक मीडिया ग्रुप दलित क्रांती पॅंथर आर्मी व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2024 कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर आत्मसन्मान गौरव पुरस्कार पत्रकार चंद्रकांत भाट यांना जाहीर झाल्याबद्दल दत्तनगर येथील कन्या विद्या मंदिर दत्तनगर व केंद्रीय शाळा दत्तनगर या दोन्ही शाळेच्या वतीने पत्रकार चंद्रकांत भाट यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

कन्या शाळा दत्तनगरच्या मुख्याध्यापिका सौ संगीता घोरपडे अध्यापक राजाराम सुतार यांच्या हस्ते तसेच केंद्रीय शाळा दत्तनगरचे अध्यापक शरद सुतार सुभाष शिंदे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत भाट यांचा सत्कार करण्यात आला पत्रकार भाट यांनी पुरस्कारापर्यंत कसे पोचलो याविषयी पत्रकारितेच्या प्रवासातील अनुभव कथन करून आपले मनोगत व्यक्त केले.

या समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा श्रीकांत माळकर व प्रा मेजर के एम भोसले अध्यापक किरण पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये चंद्रकांत भाट यांच्या कार्याचे कौतुक करत पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

या समारंभास केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनुराधा शिनगारे अध्यापिका छाया साबळे विद्या पाटील कन्या शाळेचे अध्यापक इनास बारदेसकर अध्यापिका रूपाली भगाटे सुजाता खोत यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अध्यापिका अस्मिता सुतार यांनी स्वागत केले अध्यापक दिलीप कोळी यांनी आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने