Top News

शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीसाठी दुपारपर्यंत सरासरी ५० टक्के मतदान

 


सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज रविवारी दुपार पर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले. दरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, पोलिस उपाधिक्षक रामेश्वर वैंजने यांनी भेट देवून पाहणी करून सूचनाही केल्या.

शिरोळ तालुक्यातील राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, नवे दानवाड, अकिवाट, हेरवाड, टाकवडे, शिवनाकवाडी, लाटवाडी, अब्दुललाट, औरवाड, कनवाड, चिंचवाड, हरोली, कवठेसार, उमळवाड, संभाजीपूरमध्ये सकाळी ७ : ३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९ : ३० वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. मात्र, १० वाजलेनंतर प्रयेक मतदान गर्दी झाली होती. काही ठिकाणी तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते, मात्र अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, पोलिस उपाधिक्षक रामेश्वर वैंजने यांनी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह पत्येक मतदान केंद्राला भेट दिल्यामुळे ज्या - त्या गावातील तणाव निवळला. दुपारी १२ वाजेपर्यंत सरासरी ५० टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी २ : ३० वाजेपर्यंत मतदारांची मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. काही अपंग व वयस्कर लोकांना काही पदाधिकारी गाडीच्या माध्यमातून तर काही हात धरून मतदान केंद्रापर्यंत पोहचवत होते.

तसंच मतदान केंद्र परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले अस त्यामुळे व  २०० मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बुथ लावणे, प्रचार साहित्य बाळगणे, मोबाइलचा वापर न करण्याच्या सूचना दिल्यानंतरही काही नागरीक आणि युवकांनी मोबाईल मतदान केंद्र परिसरात आणल्यामुळे त्यांचे मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने