हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीसाठी रविवारी किरकोळ वादावाद वगळता मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडली. दुपारी १२ वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी झाली सायंकाळी ५ : ३० वाजे पर्यंत ८८.८० टक्के मतदान झाले. एकुण ५६९८ मतदारापैकी ५०६० जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५ : ३० नंतर मतदान यंत्रे सील करुन शिरोळ तालुका कार्यालयात जमा करण्यात आले.
हेरवाड मध्ये सकाळी ७ : ३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९ : ३० वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. मात्र, १० वाजलेनंतर प्रयेक मतदान गर्दी झाली होती. काही ठिकाणी तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते, मात्र अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, पोलिस उपाधिक्षक रामेश्वर वैंजने यांनी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह पत्येक मतदान केंद्राला भेट दिल्यामुळे गावातील तणाव निवळला. दुपारी १२ वाजेपर्यंत सरासरी ५० टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी २ : ३० वाजेपर्यंत मतदारांची मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. काही अपंग व वयस्कर लोकांना काही पदाधिकारी गाडीच्या माध्यमातून तर काही हात धरून मतदान केंद्रापर्यंत पोहचवत होते. दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी झाली सायंकाळी ५ : ३० वाजे पर्यंत ८८ .८० टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदान यंत्र सील करुन शिरोळ तालुका कार्यालयात जमा करण्यात आले. मतदान केंद्र परिसरात १४४ कलम लागू करण्यात आल्यामुळे व २०० मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बुथ लावणे, प्रचार साहित्य बाळगणे, मोबाइलचा वापर न करण्याच्या सूचना दिल्यानंतरही काही नागरीक आणि युवकांनी मोबाईल मतदान केंद्र परिसरात आणल्यामुळे त्यांचे मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आल्यामुळे पोलिस व मतदारांच्यात थोडी बाचाबाची झाली.
