हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
ग्रामपंचायत हेरवाडच्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान केंद्र क्र. १ मध्ये बदल करण्यात आला आहे. हे मतदान केंद्र माळभागातील कुमार विद्या मंदिर हेरवाड येथे नेण्याचे नियोजन होते पण काही कारणास्तव कन्या विद्या मंदिर हेरवाड येथील जुनी पत्र्याच्या इमारतीत आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
वॉर्ड क्र.२ व ३ चे मतदान केंद्र कन्या शाळेतील नवीन षटकोनी खोलीमध्ये असणार आहे. तर वॉर्ड क्र. ४ चे मतदान केंद्र ४/ २ हे -हनुमान मंदिरापासून पुढे थोड्य अंतरावर असणाऱ्या सांस्कृतिक भवन व ४/१ हे ग्रामपंचायतीच्या सभागृहात होणार आहे. येथे आहे. वॉर्ड क्र. ५ चे मतदान केंद्र कुमार विद्या मंदिर (माळभाग ) हेरवाड येथे आहे.
दरम्यान मतदानाच्या पार्श्वभूमीवर हेरवाडमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्र परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बुथ लावणे, प्रचार साहित्य बाळगणे, मोबाइलचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
