Top News

हेरवाडच्या नुतन पदाधिकार्‍यांचा शिरोळ तालुक्यात विविध ठिकाणी सत्कार

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड ग्रामपंचायतीचे नुतन लोकनियुक्त सरपंच रेखा जाधव व सदस्यांचा शिरोळ तालुक्यातील दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हासदादा पाटील, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, भाजपाचे तालुका नेते अनिलराव यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गटनेते दिलीप पाटील व वसंतराव देसाई यांच्या माध्यमातून बहूजन विकास आघाडीने हेरवाड ग्रामपंचायतीमध्ये एकहाती सत्ता स्थापन केली आहे. रेखा जाधव या भरघोस मतांनी निवडूण येवून पहिली लोकनियुक्त महिला सरपंच ठरल्या आहेत. त्यामुळे दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर या नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. शिरोळ येथे माजी आमदार उल्हासदादा पाटील यांच्या हस्तेही सत्कार करण्यात आला. यानंतर जयसिंगपूर येथील माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते यड्रावकर चेंबर येथे नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर शिरोळ येथील भाजपाचे तालुका नेते अनिलराव यादव यांच्या निवासस्थानीही नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दामोदर सुतार, गटनेते दिलीप पाटील, वसंतराव देसाई, अर्जुन जाधव, युनूस जमादार, सुनिल माळी, सुधीर माळी, जमीर मुल्ला, गिरीष पाटील, बाबासाहेब नदाफ यांच्यासह नुतन सदस्य हयाचाँद जमादार, छाया गायकवाड, छाया सुर्यवंशी, सचिन पाटील, शितल कांबळे, दयानंद पाटील, दिपाली बरगाले, विद्या माने, प्रमोद माळगे, अफसर मकानदार, भरत पोवार , संतोष चिंदरकर, विजयमाला  पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने