अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क
बोरगाव येथील नगरसेवक व बोरगाव टेक्सटाईल पार्कचे विद्यमान अध्यक्ष श्री शरद बाळासाहेब जंगटे यांना नुकताच इचलकरंजी येथील शाहू महोत्सव पुरस्कृत "युवा उद्योजक" हा नामांकित राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे शरद जंगटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
शरद जंगटे यांचा जन्म 10 डिसेंबर १९८६ साली जंगठे कुटुंबात झाला. घरची बेताची परिस्थिती असताना हि शरदरावानी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. आपन समाजसाठी काही तरी देन लागतो या आशेने शरदरावानी समाज कार्या सोबत टेक्सटाईल व्यवसायात स्वतःला वाहुन घेतले.
कर्नाटक सरकारने बोरगाव येथील गायरान जागेवर सुसज्ज असा टेक्सटाईल पार्क उभारला आहे. टेक्सटाईल क्षेत्रातील तज्ञ अनुभवाच्या जोरावर जंगटे यांनी सीमाभागातील उद्योजकांमधे आपले वेगळे असे नाते निर्माण केले आहेत.नविन उद्योग निर्माण करणे,त्यासाठी शासनाच्यावतीने लाभार्थिना सबसिडी मिळवून देने यातुन शरद जंगटे यांची पारदर्शकता दिसुन येऊन नव उद्योजकांना पेरना मिळली.
बोरगाव येथे समाज कार्याबरोबर,राजकीय क्षेत्रात हि आपल्या कार्याचा ठसा उमटवत असताना वार्ड क्रमांक १ मध्यें विकास कामाच्या जोरावर राज्यात विक्रमी मताने निवडून येउन इतिहास निर्माण केला आहे.कोरोना काळात अनेक गरजु लोकांना स्वतः स्व खर्चातून धान्य किटचे हि वाटप करण्यात आले आहे.
टेक्सटाईल पार्कचे सुशोभीकरण,नवनवीन उपक्रम, सरकारी आधीकारी यांना पार्क मध्यें बोलावुन मजुर व उद्योजक यांच्या समस्या मार्गी लावने यामध्ये शरदरावांचा मोलाचा वाटा आहे. सतत परोपकारी भावना मनात ठेऊन सदैव्य कार्यरत असणाऱ्या शरदरावांची इचलकरंजी येथील लोकराजा शाहू महाराज चॅरीटेबल समितीच्या वतीने दखल घेऊन हा राज्य स्तरीय"युवा उद्योजक" नामांकित पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा इचलकरंजी येथील घोरपडे नाट्य गृहात मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सन्मानित करण्यात येणार आहे.
