Top News

सदलगा समविचारी श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तात्यासाहेब कदम; उपाध्यक्षपदी रंगराव बन्ने

 


अजित कांबळे/शिवार न्यूज नेटवर्क :

पत्रकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या सदलगा समविचारी श्रमिक पत्रकार संघाची कार्यकारिणीची मिटींग येथील एकवीरा मंदिरात संपन्न झाली. यावेळी सदलगाचे जेष्ट पत्रकार तात्या साहेब कदम यांची एकमताने संघाच्या अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष पदी रंगराव बन्ने यांची निवड करण्यात. संजय अवघडी हे कार्याधक्षपदी तर खजिनदार म्हणुन पत्रकार विक्रम शिंगाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.कार्यदशीपदी उदय पांगिरे, तर सचिव म्हणून प्रतिक कदम यांची निवड करण्यात आली. 

       यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार उदय पांगिरे यांनी संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपन सर्वांनी एकसंघ राहून प्रयत्न करायचा आहे. पत्रकार दिनाचे नियोजन करण्यासाठी लवकरच आणखीन एका बैठकीचे आयोजन करू असे सांगितले. पत्रकार विक्रम शिंगाडे यांनी संघाने वर्षभरासाठी पूरक कार्यक्रम करण्यासाठी नियोजन करायचे आहे. त्याची सुरुवात बेडकिहाळ येथूनच होईल असे सांगितले.निवड कार्यकमाचे स्वागत नरसु खोत यांनी केले. प्रास्ताविक उत्तम माने यांनी केले. 

बैठकीत संघाच्या सल्लागार मंडळात अँड. प्रीती हट्टीमनी, प्राध्यापिका कल्पना रायजाधव, सागर केसरकर, मोहन सुखसारे, शरद जाधव , अमर माने, संजय केरुरे यांची निवड करण्यात आली.

बैठकिस संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र केरुरे, रंगराव बन्ने, तात्यासाहेब कदम, संजय अवघडी, प्रतीक कदम, बजरंग रोडे, आण्णासाहेब केरुरे ,अजित सगरे सर , संपतराव थोरात , जोतीराम मगदूम , उत्तम माने, नरसू खोत, तानाजी रोडे , सुभाष हट्टी, रणजीत जगताप, विजय संकपाळ ,इम्रान मुजावर, शितल चौगुले, अमर माने, संजय केरुरे आदी पत्रकार उपस्थित होते. संजय अवघडी यांनी आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने