Top News

कणेरी मठ येथील कैलास स्वामीजींची हेरवाड येथील मातंग समाजाला भेट

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क : 

कणेरी मठ येथील कैलास स्वामीजी यांनी हेरवाड येथील मातंग समाजबांधवांना भेट देवून येथील मातंगी मंदिराचे दर्शन घेतले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, हेरवाड गावाला ऐतिहासिक वारसा आहे. आणि येथील सर्वच जागृत देवस्थान मनाला भावणारे असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी येथील मातंगी मंदिरात जावून दर्शन घेतले. यावेळी समाजबांधवांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी वारनानगर येथील श्री पटेल, अब्दुललाट येथील तुकाराम महाराज, श्री सोळवडे, किशोर गायकवाड, तानाजी गायकवाड यांच्यासह समाजातील बांधव उपस्थित होते. 


थोडे नवीन जरा जुने