जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
समाजामधील तरुण एकत्र झाला आणि त्यांनी संघटितपणे काम करायचे ठरवले तर समाज कार्याला प्रेरणा आणि गती मिळते त्यामुळे युवकांनी संघटित होऊन सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन समाज कार्याला प्राधान्य द्यावे असे उदगार जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी काढले जयसिंगपूर शहरातील झेले चित्रमंदिर शेजारील आयोध्या मालू क्रीडा नगरीमध्ये जैन प्रीमियर लीग 2022 या क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ शुक्रवारी संपन्न झाला यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते,
या स्पर्धेचे उदघाटक अरिहंत उद्योग समूह बोरगावचे विश्वस्त उत्तम पाटील बोरगावकर म्हणाले खेळामुळे माणसाच्या आयुष्यात यश किंवा अपयश पचवण्याची ताकद निर्माण होते, त्यामुळे युवकांनी खेळ कोणताही असो खेळाकडे आपले लक्ष केंद्रित करावे, समारंभास प्रमुख उपस्थित असलेले उद्योगपती राजेंद्र मालू यांनी संजय पाटील यड्रावकर यांच्या कार्यशैलीचा गौरव करताना या स्पर्धेसाठी आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झेले यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना जैन समाजातील या युवकांना संजय पाटील यड्रावकर यांनी या पुढच्या काळात सातत्याने मार्गदर्शन करावे आणि या युवकांना प्रोत्साहन द्यावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या स्पर्धेचे उदघाटन अरिहंत उद्योग समूहाचे विश्वस्त उत्तम पाटील बोरगावकर यांच्या हस्ते झाले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाहुबली खोत यांनी केले तर संयोजन जैन युवाशक्तीच्या युवकांनी केले, या हाफ पिच क्रिकेट स्पर्धा रविवार पर्यंत सुरू राहणार आहेत, यावेळी मान्यवर पाहुण्यांसह सर्व संघांच्या मालकांचा संयोजकांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला उदघाटनाच्या दिवशी रात्री साडेबारापर्यंत सामने सुरू होते हे क्रिकेट सामने पाहण्यास अनेक महिला भगिनीसह क्रिकेट शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
