जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर रेल्वे स्टेशन लगत रेल्वे लाईन वर पश्चिमेच्या बाजूस असलेल्या रेल्वे फाटकांमधून जयसिंगपूर तसेच शिरोळ तालुक्यातून, बाहेरून येणाऱ्या अनेक गावातून दानोळी, कोथळी, उमळवाड, कवठेसार, कुंभोज याचबरोबर पश्चिमेकडे असलेल्या सर्व गावांसह अगदी वडगांव वाठार पुणे मुंबई महामार्गा पर्यंत येजा करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे, त्याचबरोबर ही रेल्वे लाईन क्रॉस करून दररोज हजारो लहान मोठी वाहने येथून धावत असतात, मालवाहू गाड्यांची संख्या देखील मोठी आहे, अनेक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, शेतीमालाच्या विक्रीच्या निमित्ताने येणारे शेतकरी, नोकरीच्या निमित्ताने जयसिंगपूर आणि परिसरातून ग्रामीण भागातून येणारे नोकरदार यांची मोठी रहदारी या मार्गावर असते मागील अनेक वर्षापासून या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या या तमाम नागरिकांची या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी मागणी होती आपण स्वतः याबाबत सातत्याने राज्य शासनाकडे आग्रह धरला होता, याचाच भाग म्हणून शुक्रवारी राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठी 45 रुपये कोटी रुपये खर्चास तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे,
या रेल्वे मार्गावर लवकरच उड्डाणपूल उभारला जाईल आणि याचा फायदा जयसिंगपूर शहराचे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होईल रुग्णांना वेळेत उपचारासाठी दवाखान्यात नेणे सोयीचे होईल, रेल्वे फाटक बंद असल्याच्या काळात गंभीर रुग्णांना दवाखान्यात नेताना उशीर झाल्यामुळे अनेकांनी प्राण गमावले आहेत, महापुराच्या काळात नागरिकांना बाहेर पडणे अथवा स्थलांतरित करणे अतिशय सोयीचे होईल, विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आपल्या शिक्षण संस्थेत वेळेत पोहोचता येईल नोकरदार वेळेवर आपल्या कामाच्या ठिकाणी हजर होऊ शकतील त्याचबरोबर शेतीमाल घेऊन विक्रीसाठी येणारे शेतकरी बाजारपेठेमध्ये लवकर पोहोचतील त्यामुळे या सर्व घटकांना या रेल्वे उड्डाणपुलाचा मोठा फायदा होणार आहे असे सांगताना बैठकीस उपस्थित असलेल्या रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या या फुला संदर्भात रेल्वे प्रशासनाची सहकार्याची भूमिका राहील असे सांगितल्याचे म्हंटले आहे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे बऱ्याच वर्षाच्या मागणीला न्याय दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत, शुक्रवारी झालेल्या बैठकीस
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव भूषण गगराणी नगरविकास खात्याचे मुख्य सचिव सोनिक साहेब, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता रजनीश माथुर, मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता राजेश जयस्वाल(पूल). यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
.jpg)