Top News

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या तालुका अध्यक्षपदी दिपक बंडगर


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जिल्हा शाखेच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी हेरवाड येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक बंडगर यांची निवड करण्यात आली आहे. 

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास ही सामाजिक चळवळ राबवली जाते. सामाजिक कार्यकर्ते दिपक बंडगर यांनी समाजातील केलेल्या उत्कृष कार्याची दखल घेऊन त्यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष नारायण पोवार, जिल्हा सचिव बाजीराव पाटील यांनी बंडगर यांना दिले आहे.

थोडे नवीन जरा जुने