Top News

यड्राव बँकेला आदर्श सहकारी संस्था पुरस्कार


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व हेल्थ ऑफ नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव या संस्थांच्या वतीने यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेला आदर्श सहकारी संस्था या आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, महाराष्ट्र कर्नाटक व गोवा राज्यातील सहकारी संस्थांच्या कार्यप्रणाली मधून या संस्थानी यड्राव सहकारी बँकेची या पुरस्कारासाठी निवड केली होती, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, यांच्या हस्ते बेळगाव येथे संपन्न झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले, यड्राव सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदूम, बँकेचे चार्टर्ड अकाउंटंट विद्यासागर बस्तवाडे, तज्ञ संचालक सचिन देशिंगे बँकेचे कार्यकारी संचालक श्रीशैल नायकुडे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

सहकारमहर्षी शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेल्या माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यड्राव सहकारी बँकेने नेत्रदीपक कामगिरी करताना बँकिंग क्षेत्रात मागील अनेक वर्षात विश्वासार्हतेने काम करताना लौकिक प्राप्त केला आहे, तसेच सभासद ठेवीदार व कर्जदार यांच्या सहकार्याने व्यवसाय वृद्धी केली आहे.

यड्राव सहकारी बँकेला लाभलेल्या या पुरस्कारामुळे बँकिंग क्षेत्रात यड्राव सहकारी बँकेने केलेल्या कार्याची दखल घेऊन संस्थेचे विश्वस्त व अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.


थोडे नवीन जरा जुने