कुरुंदवाड येथील दोषी कुटुबियांचा आदर्शवत उपक्रम
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
समाजात वाढदिवस करण्याची प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते. मात्र येथील डाँक्टर पत्नी ऋतूजा विशाल दोषी (सध्या रा. फलटण मूळ गाव कुरुंदवाड) यांनी आपल्या पतीचा वाढदिवस घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील वृद्धांना पंढरपूरच्या विठू माऊलीचे दर्शन घडवून त्यांना सुखद धक्का देत वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहर्यावर हास्य आणि समाधान खुलले आहे.
समाजातील अनेकजण वृद्धाश्रमात जावून आपला वाढदिवस साजरा करतात मात्र त्यांना खाण्यापिण्यापेक्षा मायेचा आधार आणि समाधानाची गरज महत्वाची आहे हे ओळखून ऋतूजा यांनी जानकी वृद्धाश्रमातील वृद्धांना पंढरपूरच्या विठू माऊली चे दर्शन घडवून आणण्याचा निर्णय घेतला होता.त्यासाठी वृद्धधाश्र चालक बाबासाहेब पुजारी यांच्याशी संपर्क साधून वृद्धांना दोन दिवस तिर्थयात्रा करण्यासाठी लक्झरी बसने मंगळवारी सकाळी पंढरपूरला प्रस्थान केले.
दोन दिवस प्रवास यात्रेमुळे वृद्धांच्या आनंदाला पारावारच उरला नसून त्यांच्या चेहर्यावरील आनंदाने डाँक्टर दोषी दाम्पत्य समाधान व्यक्त केले. वृद्धाश्रमातील वृद्धांना तिर्थयात्रा घडवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने या स्तुत्य उपक्रमाची कौतुक होत आहे.
वृद्धाश्रमातील वृद्धांना प्रत्येकजण खाऊ देतात. त्यांना आहारापेक्षा मानसिक आधार, प्रेम आणि समाधान देणे गरजेचे असते. दोन दिवस तिर्थक्षेत्राठीकाणी घेवून गेल्यास घरच्या आठवणी विसरून मनाला समाधान मिळते. त्यामुळे पतीच्या वाढदिवसाचे निमित्त करून वृद्धांना विठू माऊलीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून समाधान वाटले.
ऋतूजा विशाल दोषी, फलटण (मूळ रा. कुरुंदवाड)
