अजित कांबळे/ शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्रातून दुचाकी वरून कर्नाटकात गांजा विक्रीसाठी येणाऱ्या एका युवकाला मोठ्या शिताफीने निपाणी पोलिसांनी मंगळवारी (ता.११)अमीर बशीर जमादार (वय २१ राह.तेरवाड ता. शिरोळ) याला पोलिसांनी अटक केली होती तर दुसरा आरोपी फरारी होता. गुरुवारी सकाळी ११ वाजता बोरगाव सर्कल परिसरात त्यालाही अटक करण्यात आली. प्रसाद प्रकाश आंबी (वय २३) असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी दोघा आरोपीकडून सुमारे सहा हजार रुपये किमतीचा ४९० ग्राम गांजा, आठ हजार रुपये चा मोबाईल आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. संबंधित दुसऱ्या आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून त्याचीही पोलिसांनी हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आरोपी अमीर जमादार हा शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथून कर्नाटकातील निपाणी परिसरात गांजाची तस्करी करीत असल्याची माहिती बसवेश्वर चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील, चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक बसवराज एलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी बसवेश्वर चौक पोलिसांचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी, हवालदार शेखर असोदे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून संशयित आरोपी अमीर जमादार याला मुद्देमालासह दोन दिवसापूर्वी ताब्यात घेतले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याने गांजा विक्रीसाठी तेरवाड हून आपण गांजा विक्रीसाठी निपाणीत आल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर अमली पदार्थ विक्री विरोधी गुन्हा दाखल करून ही कारवाई केली.
त्याचवेळी दुसऱ्या संशयित आरोपी अंबी हा पसार झाला होता.बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक डी.बी. कोतवाल,एम. ए. तेरदाळ, के. एम. पाटीलयांच्यासह कर्मचाऱ्यांनी बोरगाव सर्कल येथे प्रसाद अंबी यांना अटक केली. बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
----------–-------------------------------बोरगाव हुन प्रतिनिधी अजित कांबळे.
---
