Top News

हेरवाडच्या सुर्यवंशी कुटुंबियांचा एक आदर्श उपक्रम

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

          कै.शिवराज शशिकांत सुर्यवंशी यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ कन्या हेरवाड शाळेत ब्लँकेट आणि खाऊ वाटप कार्यक्रम - सुर्यवंशी कुटुंबाचा एक विधायक उपक्रम.

               आज बुधवार दिनांक 19 /10/ 2022 रोजी हेरवाड येथील सूर्यवंशी कुटुंबामार्फत कै.शिवराज शशिकांत सूर्यवंशी यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ कन्या विद्या मंदिर हेरवाड शाळेमध्ये 51 मुलींना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.तसेच शाळेतील सर्व मुलींना बिस्किट पुडा खाऊ म्हणून देण्यात आला.सूर्यवंशी कुटुंबामार्फत एक विधायक उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

              यावेळी श्री.शशिकांत नामदेव सूर्यवंशी,सौ.स्वाती शशिकांत सूर्यवंशी,श्री.प्रकाश नामदेव सूर्यवंशी,सौ.छाया प्रकाश सूर्यवंशी व श्री.अमोल प्रकाश सूर्यवंशी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष तराळ, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.श्री यादव सर यांनी आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने