Top News

"शिरढोणच्या कु.आराध्या पाटील हिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा"

  


शिरढोण / शिवार न्यूज नेटवर्क :

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,साहित्य परिषद बहुद्देशीय संस्था शिरढोण चे सचिव डॉ. कुमार रामगोंडा पाटील व शिरढोण ग्रामपंचायत सदस्या सौ. तेजस्विनी कुमार पाटील यांनी आपली कन्या कु.आराध्या कुमार पाटील (इयत्ता 2री )हिचा वाढदिवस कन्या विद्या मंदिर शिरढोण येथे तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांना वही व पेन्सिल भेट देऊन साजरा केला.दरवर्षी शिरढोणमधील सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात.विधायक अभिनव उपक्रमाने वाढदिवस साजरा करुन पाटील दाम्पत्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला.

                यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.विठू बंडगर सर,वर्गशिक्षक श्री.राजेश दळवी सर,माजी उपसरपंच श्री.विजय सुर्यवंशी,सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.बाबासो मालगावे, ग्रामपंचायत सदस्या सौ.तेजस्वीनी पाटील व डॉ.कुमार पाटील,अध्यापक शांतीनाथ इंगळे,सुभाष चुडाप्पा,पुंडलिक नाईक,संगिता भावसार,रिहाना कोठावळे, ज्योस्ना कटकोळे उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने