Top News

कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्याची पाहणी करण्यासाठी इंग्लंडमधील तसेच भारतातील विद्यापीठांची भेट


नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य लोकल टू ग्लोबल झालेले असतानाच आज दिनांक 19 ऑक्टोबर 2022 रोजी इंग्लंड मधील डिसाईड विद्यापीठ, भारतामधील संजय घोडावत विद्यापीठ पुण्याचे डी वाय पी विद्यापीठ आणि चेन्नई येथील एस आर एम विद्यापीठ या चार विद्यापीठाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयास आज भेट देऊन कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कार्याबद्दल सविस्तर माहिती घेतली.

यावेळेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद संकपाळ यांनी त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या अभिनव आपत्ती व्यवस्थापन उपक्रमाबद्दल सविस्तर सादरीकरण केले जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधनसामग्रीचे सादरीकरण केले जिल्ह्यातील स्वयंसेवकांची अभिनव असणारी जी फौज आहे ज्याच्यामध्ये आपदा सखी आपदा मित्रांचा सहभाग आहे त्याविषयीची सविस्तर माहिती दिली.

हे सर्व पाहून परदेशातून तसेच भारतातील विविध ठिकाणातून आलेल्या विद्यापीठाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्गणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्याचे कौतुक केले. यानंतर करवीर आणि शिरोळ तालुका या ठिकाणी पूर्व बाधित होणाऱ्या भागाची पाहणी करण्यात आली त्याही ठिकाणी अभ्यास दौरा करून माहिती घेण्यात आली.

डिसाईड युनिव्हर्सिटी इंग्लंड कडून विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर सायमन रिंग्स यांनी आज भेट दिली त्यांच्यासोबत इतरही विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही या सर्व लोकांना आपत्ती व्यवस्थापन कार्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले क्षेत्र भेटीसाठी त्यांनी शिरोळ तालुक्यात नृसिंहवाडी येथे भेट दिली, पूरस्थिती विषयक माहिती जाणून घेतली. यावेळी वजीर रेस्क्यू फोर्स चे अध्यक्ष श्री रौफ पटेल आणि जवान उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने