कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
राज्य सरकारच्या शिधा जिन्नस संच योजनेचा शेतकरी सहकारी तंबाखू संघाच्या स्वस्त धान्य दुकानातून दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना शिधाजिन्नसचे वाटप करण्यात आले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, तहसिलदार अपर्णा मोरे आणि संघाचे संचालक अँड. सुशांत पाटील यांच्या हस्ते या शिधा संचाचे वाटप करण्यात आले.
3 रुपये किलो तांदूळ व 2 रुपये किलो गहू मिळणाऱ्या रेशनकार्ड धारकांना दिवाळी निमित्त राज्या सरकारने शिधाजिन्नस योजनेतून शंभर रुपयात चणाडाळ, पामतेल, साखर आणि रवा असे प्रत्येकी एक किलोचे पाकीट लाभार्थ्यांना देण्याची योजना आहे. शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून या शिधासंचाचे वाटप करण्यात येत आहे.
या योजनेचे तंबाखू संघाच्या स्वस्त धान्य दुकानातून वाटप करुन योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
