Top News

ढगफुटी सदृश्य पावसामुळे सांगली - कोल्हापूर बायपास महामार्ग बंद

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

ढगफुटी सदृश्य पावसामुळे उदगांव तालुका शिरोळ येथील ओढ्यातील पाण्यामुळे सांगली - कोल्हापूर बायपास महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या मार्गावर सुमारे तीन ते चार फूट पाणी असल्याने वाहनधारकांनी येथून धोकादायक वाहतूक करू नये' अशा सूचना संबंधित प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. 

शनिवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण शिरोळ तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. इतकेच नव्हे तर शिरोळ तालुक्यातील अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावरील उदगाव येथील ओढ्याच्या पाण्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

थोडे नवीन जरा जुने