Top News

शिरढोणमध्ये गोठ्याची भिंत कोसळली ; सुदैवाने जिवितहानी नाही


शिरढोण / शिवार न्यूज नेटवर्क :

काल रात्री शिरोळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. रात्री १२ वाजल्यापासून सुमारे २ वाजेपर्यंत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील स्वाभिमानीचे कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांच्या गोठ्याची भिंत कोसळली. सुदैवाने गोठ्यात जनावरे नसल्यामुळे जीवितहाणी टळली. 

थोडे नवीन जरा जुने