स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ते झाले आक्रमक
इसाक नदाफ/ शिवार न्यूज नेटवर्क
शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी अधिक साडेतीनशे रुपये दराची घोषणा करून तसे पत्र द्यावे त्याशिवाय ऊस तोडू देणार नाही अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दत्तवाड (ता. शिरोळ) साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर हल्ला करून ही ऊस वाहतूक रोखली. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरचे हेडलाईट फोडून तसेच चाकातील हवा सोडून निषेध केला. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून तीव्रआंदोलनाला सुरुवात झाली आहे.
दत्तवाड येथून एका कारखान्यामार्फत सकाळी ऊसतोड करण्यात आली. यावेळी स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड करू नये अशी विनंती त्यांना केली होती. ट्रॅक्टर मधून वाहतूक सुरू असल्याचे समजतात स्वाभिमानीचे विवेक चौगुले, सुरज हेमगिरे, प्रकाश मगदूम, श्रेणिक धुपदाळे, सचिन हेमगिरे, सुकुमार सिदनाळे, शितल धुपदाळे, रावसो धोतरे, अजित चौगुले, प्रमोद व्हसकल्ले, पिंटू स्वामी, राजू व्हसकल्ले, प्रवीण सुतार, बाबू मुल्ला, भुजबली हेमगिरे आदी कार्यकर्त्यांनी ही ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून ऊस वाहतूक बंद पाडली. ऊस दराचा आणि एफआरपी अधिक ३५० रुपयाचा पत्र दिल्याशिवाय व दराचा तोडगा निघाल्याशिवाय ऊसतोड व ऊस वाहतूक करू नये अशा सक्त सूचना दिल्या व जोरदार घोषणाबाजी करत ट्रॅक्टरचे हेडलाईट फोडून टाकले.
