नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :
क्रिकेट विश्वात आपल्या बॅटने अनेक विश्वविक्रम केलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपल्या मुलांसोबत आज सोमवार दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 5 वाजता दत्त मंदिर नृसिंहवाडी येथे आश्चर्यकारकपणे भेट दिली. काकड आरतीस उपस्थित राहून दत्त महाराजांचे दर्शन घेतले.
भेट इतकी गुप्त होती की चेहऱ्याला मास्क लावल्याने कोणासही ओळखता आले नाही. काल रात्री 10 च्या दरम्यान तेज घाटगे यांच्या मुडशिंगी येथील फार्म हाऊसवर दाखल झाले.तेथून पहाटे 4 वाजता निघून दत्तात्रयांचे दर्शन घेवून मुंबईस रवाना झाले. तेज घाटगे यांनी फोटो शेअर केल्याने सचिन तेंडुलकर नृसिंहवाडीत येवून गेल्याचे समजले.
