Top News

पंचगंगा साखर कारखान्याच्या जयसिंगपूर मधील ऑफिसला आंदोलन अंकुशने ठोकले टाळे

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

मागील हंगामाचा दुसरा हप्ता आणि चालूला किमान 3150 रुपये एकरकमी देऊन मगच कारखाना चालू करावा म्हणून सांगितले असताना मागील बिल न देता व गेल्या वर्षी पेक्षा फक्त 10 रुपये जास्त दर चालूला जाहीर करून कारखाना सुरु केला आहे तो बंद करावा म्हणून आज जयसिंगपूर येथील गट ऑफिस ला आंदोलन अंकुश च्या कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकले. 

गेली चार दिवस शिरोळ तालुक्यात कोयता बंद आंदोलन सुरु आहे त्याचा परिणाम म्हणून तुरळक ऊस तोडी सुरु आहेत त्याही बंद करण्यासाठी आंदोलन अंकुश ने आज मोटर सायकल रॅली काढली होती त्या दरम्यान जयसिंगपूर मध्ये येऊन पंचगंगा कारखान्याच्या गट ऑफिस ला आक्रमक कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकले 

यावेळी राकेश जगदाळे दिपक पाटील भूषण गंगावणे अक्षय पाटील कृष्णा गावडे आप्पा कदम संजय चौगुले यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने