Top News

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या स्थानिक विकास निधी मधून जयसिंगपूर मध्ये महिलांसाठी ओपन जिम



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क

माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या स्थानिक विकास निधीमधून जयसिंगपूर येथे स्टेशन रोडवरील दत्त मंदिरासमोरील नगरपरिषद शाळा नंबर तीन जवळ स्थानिक महिलांच्या मागणीवरून महिलांसाठी ओपन जिम उभारली आहे, सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या महिलांना व्यायामासाठी साधी सोपी साधने उपलब्ध व्हावीत आणि त्याचा वापर करून महिलांनी आपले शारीरिक आरोग्य जोपासावे यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजता या जिमचे उदघाटन माजी नगराध्यक्षा सौ. स्वरूपा राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले, यावेळी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, सुरेश शहापूरे ,संभाजी मोरे ,राहुल बंडगर, डॉ प्रसाद माने, सुनील बंडगर ,अतुल कुलकर्णी शितल चौगुले ,बाहुबली भनाजे, प्रवीण राजोपाध्ये,विवेक स्वामी सर, रुस्तुम मुजावर ,उमेश चौगुले सुभाष शेडबाळे, अजित बेळकुडे अरुण कोथळे संजय कुलकर्णी अशोक घोरपडे सूर्यवंशी सर ,तुषार भोसले ,अभिजीत कुंभार ,रवींद्र पाटील नितीन डिग्रजकर ,अक्षय खरात राहुल घाटगे,लखन पडळकर,

डॉक्टर अश्विनी माने, रंजना मानधना, सुजाता कुंभार, वीरा करमुसे ,मीना मानधना, जमुना शर्मा, माधुरी पोतदार ,माधुरी स्वामी राजश्री पोतदार यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

थोडे नवीन जरा जुने