शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
आंदोलन अंकुश ने मागील हंगामाचा दुसरा हप्ता मिळावा व चालूचा दर जाहीर करा या मागणीसाठी गेली 8 दिवस आंदोलन सुरु केले असून उसाची वाहने अनेक ठिकाणी रोखून धरून गुरुदत्त जवाहर आणि शरद कारखान्याची कोंडी केली जात आहे.
उसाची वाहतूक ठप्प झाली असून ऊस तोडी जवळपास बंद आहेत. आंदोलकांनी आज औरवाड फाटा इथे टायर पेटवून आंदोलनाची धग वाढवली आहे. कारखान्यांनी यातून लवकर तोडगा न काढल्यास आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा आंदोलन अंकुश च्या वतीने दिला जात आहे.
