Top News

बोरगाव येथे दीपावली पाडवा निमित्त भव्य शर्यतीचे आयोजन

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बोरगाव ता निपाणी येथील भाजीपाला मित्र मंडळ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीही खास दीपावली निमित्त भव्य शर्यतीचे आयोजन करण्यात आलेआहे. बुधवार दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता येथील शर्यत मैदानावर या शर्यती होणार आहेत .जनरल बैलगाडी, शर्यत जनरल घोडा बैल व घोडा गाडी शर्यत असे शर्यत होणार असून सर्व शर्यतीसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रत्येक वर्षी भाजीपाला मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य शर्यत भरविण्यात येते. यावेळी हजारोंच्या संख्येने शर्यत शौकीन उपस्थित असतात. सर्व बक्षीस भाजीपाला मित्र मंडळ यांच्या वतीने देण्यात येणार असून आपली नावे लवकरात लवकर या मंडळाकडे द्यावे,असे आवाहन शर्यत कमिटी कडून करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने