Top News

आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचा शेकापमध्ये प्रवेश



सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

   आशा वर्कर्स महिला कर्मचारी चे प्रश्न व अडचणी याविषयी जाणीव आहे , शेतकरी कामगार पक्ष व त्या पक्षाचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांचा भक्कम पाठिंबा आहे, त्यामुळे आगामी काळात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची तड लावल्याशिवाय शांत बसणार नाही, महिला कर्मचाऱ्यांच्या बाबत शासन दुर्लक्ष करीत असेल तर शेतकरी कामगार पक्षाची ताकद आणि आशा वर्कर्स कर्मचाऱ्यांची एकजूट दाखवून देऊ असा इशारा शेकाप आशा वर्कर्स युनियनच्या महिला आघाडी प्रमुख नेत्रदिपा पाटील यांनी दिला आहे.     येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्गत आशा व गटप्रवर्तकांचा मेळावा नेत्रदिपा पाटील यांच्या नेतृत्वाखाली यावेळी आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीरपणे प्रवेश करून या पक्षाला पाठिंबा दिला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई बाबासाहेब देवकरे होते , यावेळी आंतरराष्ट्रीय पत्रकार संकेत जैन व शिरोळचे ज्येष्ठ पत्रकार दगडू माने यांचा गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

    या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाई बाबुराव कदम, चित्रलेखाताई पाटील अध्यक्षा महिला सभा रायगड, सौम्या कोरडे पुरोगामी विद्यार्थी संघटना, भाई प्रविण चौधरी शे.का.प आशा व गटप्रवर्तक कर्मचारी समन्वयक महाराष्ट्र राज्य ,भाई दिगंबर कांबळे राज्य संघटक शेतकरी सभा ,भाई समरजीत पवार पाटील, ज्योती हेकडे गटप्रवर्तक औरंगाबाद, मंदाकिनी कोडक, लता केसरकर,शर्मिला काशीद, महादेवी कोळी,सुरय्या तेरदाळे,महादेवी पाटील,गायत्री कुटाळे तसेच जळगाव,संभाजीनगर (औरंगाबाद),नांदेड,व चंद्रपूर जिल्हयातील आशा व गटप्रवर्तकांचा सहभाग होता, सुत्रसंचालन सिमा पाटिल यांनी केले, आभार माया पाटील यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने