हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असणाऱ्या हेरवाड गावामधील एका ६५ चिकन दुकानदाराने दारू पिण्यास मज्जाव केल्यामुळे एका गृहरक्षक दलाच्या जवानाने बघून घेण्याची भाषा केल्याची घटना समोर आली आहे. अशा घटनेमुळे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या गृहरक्षक दलाचा विश्वास ढासळत चालला आहे.
सर्व सण, उत्सव आणि कोरोना कालावधीत गृहरक्षक दलाच्या जवानांचे कार्य नेहमीच कौतुकास्पद राहिले आहे. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून हे जवान आपली सेवा बजावत असतात. मात्र, अशा दारूच्या आहारी गेलेल्या जवानामुळे संपूर्ण गृहरक्षक दलाची मान खालावली जाते. असाच प्रकार हेरवाड येथील एका ६५ चिकन विक्री करणाऱ्या दुकानात घडला. संबंधित जवान ६५ चिकन खाण्यासाठी या दुकानात गेला, त्यानंतर मद्याची बाटली बाहेर काढताच त्या दुकानदाराने येथे दारू पिण्यास मनाई असल्याचे सांगितल्यानंतर 'तु मला ओळखला नाहीस, असे म्हणत बघून घेण्याची भाषा केली. दरम्यान, उघड्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे हे कायद्याने बेकायदेशीर आहे. असे असताना सुद्धा सदरच्या जवानाची वागणूक ही चुकीचीच आहे.
