Top News

शंकरराव जाधव विद्या मंदिरमध्ये मुलांची दात तपासणी

 लायन्स क्लब इचलकरंजी यांनी जपली सामाजिक बांधिलकी


इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील शंकरराव जाधव विद्या मंदिरमध्ये मुलांची दात तपासणी लायन्स क्लबच्या वतीने हेल्दी स्कूल उपक्रमांतर्गत मोफत मुलांची दात तपासणी करण्यात आली.या आरोग्य तपासणी शिबीरात प्रसिद्ध दात तज्ञ डॉ. तेजल दरक व डॉ . सेजल मोदी यांनी 80 मुलांची दात तपासणी करत औषधोपचार केले.तसेच मुलांच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.

इचलकरंजी लायन्स क्लबच्या वतीने विविध सामाजिक , आरोग्य विषयक सातत्याने उपक्रम राबवण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून मुलांची दात तपासणी करण्यात आली .यावेळी इचलकरंजी लायन्स क्लबच्या वतीने. सर्व मुलांना ब्रश व colgate चे वाटप करण्यात आले .या वेळी इचलकरंजी लायन्स क्लबच् चे अध्यक्ष महेंद्र बालर , सेक्रेटरी सुभाष तोष्णीवाल, संदीप सुतार,सौ श्रुतिका भंडारी ,सौ कांता बालर ,सदस्या यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गीता पाटील मॅडम ,श्री सचिन वारे सर ,सौ लिमकर मॅडम ,सौ माळी मॅडम ,सौ माणगावे मॅडम शिक्षक पालक , विद्यार्थी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने