Top News

वीर सेवा दल व टी डब्लू जे यांच्यावतीने रविवारी वीराचार्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

 


गोमटेश पाटील / शिवार न्यूज नेटवर्क :

वीर सेवा दल व टी.डब्ल्यू.जे.इवेंट्स सांगली यांच्या वतीने समाजातील तरुण व्यसनमुक्त व्हावा, सशक्त तरुण घडावा तसेच त्यांच्या क्रीडा कौशल्यांना वाव मिळावा यासाठी वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या ६८ व्या जन्मजयंती निमित्त भव्य राज्यस्तरीय वीराचार्य मॅरेथॉन स्पर्धा रविवार दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वा. दिगंबर जैन बोर्डिंग, सांगली हायस्कूल समोर, सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक असोसिएशन व सांगली जिल्हा अ‍ॅमॅच्युर अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 या स्पर्धा खुला पुरुष गट,खुला महिला गट,१८ वर्षाखालील मुले,१८ वर्षाखालील मुली,वीर सेवा दल सदस्य अशा पाच गटामध्ये संपन्न होणार आहेत. या प्रत्येक गटात दहा बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी नोंदणीकृत सर्व स्पर्धकांना टी.शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेची नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने ७७९८७१८२९७ या नंबरवर तर ऑफलाईन नोंदणी वीर सेवा दल मध्यवर्ती समिती सांगली, , कर्मवीर मल्टिस्टेट जयसिंगपूर, वीराचार्य पतसंस्था सांगली व श्री शांतिसागर पतसंस्था शिरगुप्पी या संस्थांच्या शाखांमध्ये करावी असे आवाहन वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे सेक्रेटरी अजितकुमार भंडे यांनी केले आहे.

         या स्पर्धेच्या संयोजनाकरिता वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील, व्हा.चेअरमन सुभाष मगदूम, जॉ.सेक्रेटरी अभय पाटील, मुख्य संघटक सुनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर स्पर्धेचे नियोजन क्रीडा विभाग सहकार्यवाह सचिन नवले हे करीत आहेत .


थोडे नवीन जरा जुने