सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ व परिसरात ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कार्य समाजाभिमुख असून या संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्शवत व्यक्तींना पुरस्कार देऊन, सन्मान करून त्यांच्या कार्याची पोचपावती दिली आहे, पुरस्कार प्राप्त शिरोळ भूमिपुत्रांनी दाखवलेली कर्तबगारी ही गावाला भूषणावह असून जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातूून या पुढील काळात कौटुंबिक संस्कार याविषयी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिरोळचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले. येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष पूर्ती व ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जी के मुळीक इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात शनिवारी पुरस्कार वितरण समारंभ झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून यावेळी नगराध्यक्ष पाटील बोलत होते, मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, संघाचे अध्यक्ष आत्माराम मुळीक यांनी स्वागत केले. यावेळी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांच्या हस्ते ज्येष्ठ प्रयोगशील शेतकरी वसंतराव हरिभाऊ माने -देशमुख व अनुसया वसंतराव माने -देशमुख या उभयतांना 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला, प्रसिद्ध व्याख्याते ॲड उदय मोरे यांना 'समाजभूषण' तर जेष्ठ पत्रकार दगडू माने यांना 'आदर्श पत्रकारिता' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, माजी आमदार उल्हास पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव माने- देशमुख, सत्कारमूर्ती व्याख्याते उदय मोरे व पत्रकार दगडू माने यांनी मनोगत व्यक्त केले. समारंभास उपनगराध्यक्ष कमलाबाई शिंदे , पं स च्या माजी उपसभापती अनिता माने, माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख, नगरसेवक एन वाय जाधव, आनंदराव माने -देशमुख, पत्रकार डी आर पाटील, अनिल पाटील, शिवाजी पाटील- कौलवकर, नंदिनी गावडे, संगीता माने, अमरसिंह माने ,डी के गावडे, अरविंद पाटील, रामभाऊ लामदाडे, अशोक कांबळे ,हणमंत कोळी, के एम भोसले , सुभाष पाटील, शंकर मुळीक, गणपती कुंभार
यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, उपाध्यक्ष सतीश अडगुळे यांनी आभार मानले, महेश घोटणे यांनी सूत्रसंचालन केले.

