Top News

शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेमार्फत आदर्श शिक्षकांचा सन्मान


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

              शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद कोल्हापूर,रोटरी क्लब कोल्हापूर,शिवशाहू फाऊंडेशन शाहूवाडी यांच्या मार्फत आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. कुरुंदवाड यांचे मार्फत सत्कार करणेत आला. अरुणा चंद्रकुमार शहापूरे,बाळू ज्ञानोबा यादव, अर्चना अजित पाटील,शरद बापू सुतार या आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा समावेश आहे. संस्थेचे चेअरमन पी.के.कांबळे,रईस पटेल,माया मडिवाळ यांचे शुभहस्ते सन्मान करणेत आला. याप्रसंगी मेहबूब मुजावर,विनायक मगदूम, अजित पाटील,मॅनेजर विलास कोळी,उत्तम खोत,सुनिल खाडे,विकी खबाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिलीप शिरढोणे यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने